पिंपरी (Pclive7.com):- नागपूर येथे झालेल्या थाईबॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपळे सौदागर येथील यु.एफ.एफ.सी क्लबचे विद्यार्थी यांनी कु.अवनिश गंगमवर, कु. ईशान बोंगाळे, कु.आयुष मिश्रा आणि कु.लक्ष्य मांजरेकर यांनी वयोगट १२ वर्षे, १४ वर्षे आणि १८ वर्षे थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” मिळविल्याबद्दल नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सुवर्ण भरारी घेणाऱ्या या सर्व स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आपल्या परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याची किमया या नव्या पिढीने करून दाखविले. पुढील काळात अशीच घवघवीत यश संपादन करून पिंपळे सौदागरचे नाव देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवा अश्या शुभेच्छा ही दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंग अध्यक्ष श्री नरेश म्हेत्रे सर, प्रशिक्षक पल्लवी पाटील व पालक उपस्थित होते.