विलास लांडे काय म्हणाले..?
गेली ३५ वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी २००९ साली लोकसभा लढलो आहे. २०१९ ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आले. मी १० वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
अन्यथा महेश लांडगेंना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं..
ते पुढे म्हणाले की, अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजीराव आढळरावांना आयात करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपला जागा सोडून, महेश लांडगेंना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं, आम्ही त्यांचे काम करू, असे विलास लांडे यांनी म्हटले आहे.
विलास लांडेंच्या या भूमिकेमुळे अजित पवारांची कोंडी झाल्याचे दिसून येते. बारामती पाठोपाठ आता शिरूर लोकसभेत ही अजित पवार कचाट्यात अडकणार हे स्पष्ट झालंय. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदार होऊ देणार नाही, असा चंग बांधलेल्या अजित पवार यांच्यासमोर आधी स्वपक्षीयांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आता उभं ठाकल्याचे दिसून येते. त्यामुळे आता शिरूर लोकसभेची चुरस वाढणार असल्याचे दिसून येते.























Join Our Whatsapp Group