पिंपरी (Pclive7.com):- वाकड पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत थेरगाव येथील आनंदवन सोसायटीतील एका घरावर छापा टाकून तब्बल ८ लाख ३७ हजार १०९ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून इतर ४ संशयितांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी थेरगाव येथील आनंदवन सोसायटी, लेन क्रमांक ६ मधील एका खोलीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आफनान अब्दुल कादीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत किशोर लाहू लोंढे (उर्फ कुमार लोंढे) याला अटक करण्यात आली आहे. तसेच अमोल लाहू लोंढे, घरमालक राजेंद्र किसन टेकाळे आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टतपासात आरोपींकडे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ८ लाख ३७ हजार १०९ रूपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहामक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.


















Join Our Whatsapp Group