आमदार शंकर जगताप यांच्या सूचनेला यश
ऐतिहासिक, धार्मिक आणि विज्ञानाचा अनुभव; पर्यटनाला मिळणार नवी चालना
पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनातून प्रेरणा घेत आणि स्थानिक पर्यटनाला वाव देण्याच्या उद्देशाने आमदार शंकर जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पुणे दर्शनच्या धर्तीवर ‘पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन’ (बससेवा क्र. २) ही विशेष पर्यटन सेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रवाशांच्या सेवेसाठी ही बससेवा दाखल होणार आहे. यामुळे आता पर्यटकांना अवघ्या ५०० रुपयांत शहरांतील समृद्ध वारसा, संस्कृती आणि पर्यटन वैभव जवळून अनुभवता येणार आहे.

आमदार शंकर जगताप यांनी २७ मे २०२६ रोजी पीएमपीएल प्रशासनासोबत या संदर्भात विशेष बैठक घेतली होती. सार्वजनिक बससेवेच्या माध्यमातून शहरातील पर्यटनाला चालना मिळावी, अशी सूचना त्यांनी केली होती. या सूचनेची दखल घेत पीएमपी प्रशासनाने तातडीने या सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ही सहल धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक अशा सर्व पैलूंचा संगम आहे. या एका दिवसाच्या सहलीत सर्व वयोगटातील पर्यटकांना विज्ञान, इतिहास आणि निसर्गाचा अनुभव घेता येईल. या सहलीचे बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग देखील सुरू करण्यात येणार आहे.

भेटीची प्रमुख स्थळे
चिंचवडचे महासाधू श्रीमन मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक/वाडा, सायन्स पार्क, रावेतचे इस्कॉन मंदिर यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे जे आवाहन केले आहे, त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला. पिंपरी-चिंचवड या शहराला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीला आणि पर्यटकांना एकाच प्रवासात अनुभवता यावा, हा यामागील मुख्य उद्देश होता. अवघ्या ५०० रुपयांत ‘पिंपरी दर्शन’ ही विशेष बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात पर्यटन करता येईल. पीएमपी प्रशासनाने आमच्या सूचनेची तातडीने दखल घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या सुविधेमुळे शहरातील पर्यटनाला निश्चितच एक नवी चालना मिळेल आणि नागरिक याचा मोठ्या संख्येने लाभ घेतील, असा मला विश्वास आहे.”
– शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा


















Join Our Whatsapp Group