पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर येथे महायुती उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. यावेळी महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आला.
देशात सध्या निवडणूक उत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अब की बार…..४०० पार” हा बुलंद नारा दिल आहे. आणि हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खालच्या कार्यकर्त्यांपासून तर उच्च पदाधिकारी पर्यंत अहोरात्र झटत आहे. देशाला विकसित देशाच्या पंक्तीत बसवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही, याची जाणीव आज प्रत्येक भारतीयाच्या मनात असून ते आपल्या मताच्या रुपात याची हमी देत आहेत.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सक्रिय सहभाग असणे हेच लोकशाहीचे महत्वाचे लक्षण आहे. मतदानाच्या दिवशी मतदानाची टक्केवारी चांगली असावी याकरिता मतदारांपर्यंत पोहचून त्याची प्रभावी पद्धतीने जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना पिंपळे सौदागर प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या “अब की बार…..४०० पार” या मिशनमध्ये आपला एक खारीचा वाटा देऊन त्यांच्या तिसऱ्या कार्यकालाच्या दिशेने अग्रेसर होता येईल.
यावेळी पिंपळे सौदागर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.