पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड वाहतुक विभाग हद्दीत बकरी ईद निमीत चाफेकर चौक येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरीक येत असल्याने ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतुक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे. तसेच भोसरी वाहतुक विभागाचे हद्दीत बकरी ईदच्या अनुषंगाने मनपाकडुन अनुकुल चौकाजवळ जे-५६ एमआयडीसी भोसरी येथे तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना उभारण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी जनावरांची खरेदी, वाहतुक व मांस घेवुन जाण्याकरीता व्यापारी, गि-हाईक व मुश्लिम बांधव आपल्या वाहनांनी सदर ठिकाणी येत असतात. त्यामुळे सदर परीसरात वाहनांची गर्दी होत असते.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240616-WA0027-300x188.jpg)
चिंचवड वाहतुक विभागाकडून करण्यात आलेत हे बदल..
# मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
* पर्यायी मार्ग १: सदर मार्गावरील वाहतुक एसकेएफ कंपनीकडून डावे बाजुस वळुन अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
* पर्यायी मार्ग २: सदर मार्गावरील वाहतूक मरीआई माता मंदीरापासून डावे बाजुस वळून अहिंसा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
# चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
* पर्यायी मार्ग १:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक जुना जकात नाका कडुन उजये बाजुस वळुन सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
* पर्यायी मार्ग २:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक कडुन उजये बाजुस वळुन अंहिसा चौक कडून इच्छित स्थळी जाईल.
# बिजली नगर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
* सदर मार्गावरील चाहतुक ही हनुमान मंदिर येथून डावीकडे वळुन मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल कडुन इच्छित स्थळी जातील.
तरी वरील वाहतुक बदल हा दि.१७/०६/२०२४ रोजी सकाळी ०५.०० ते १३.०० वा. दरम्यान आवश्यकतेनुसार (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहतुक बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
भोसरीतील वाहतुकीत करण्यात आलेत हे बदल..
# अनुकुल चौक ते क्वॉलीटी आईसक्रिम चौक जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
> पर्यायी मार्ग सदरची वाहने टेल्को रोडवरील गवळीमाथा/हनुमान मंदीर चौक ते ऑरलीक कंपनी चौक व पुढे क्वालीटी आईसक्रिम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
वरील प्रमाणे वाहतूक बदल हा दि.१७/०६/२०२४ ते १८/०६/२०२४ रोजी या दोन दिवशी सकाळी ०६.०० वा ते २१.०० वा दरम्यान आवश्यकतेनुसार (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत वाहतुक बदल करण्यात येत असुन नागरीकांती पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.