पिंपरी (Pclive7.com):- बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीतेच्या कुटुंबीयांना जलद न्याय मिळवून द्यावा. राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. गृहखात्यावर त्यांचा वचक राहिला नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवड शहर आणि युवासेना पिंपरी चिंचवड यांच्या वतीने निदर्शन करण्यात आले.

पिंपरीत झालेल्या या आंदोलनाला मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले, युवासेना शहरप्रमुख चेतन पवार, तुषार नवले पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नको आम्हाला १५०० रुपयांची भिक.. करा आमची सुरक्षा ठीक, खोके सरकार चले जाव, गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्राच्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, ही मागणी सर्व पिंपरी चिंचवडकरांकडून करण्यात आली.























Join Our Whatsapp Group