पिंपळे सौदागर (Pclive7.com):- निरामयता शरीराशी निगडीत आहे आणि आनंद हा मनाशी निगडीत आहे. तेंव्हा या दोन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी सत्कर्म करीत रहा, इतरांना बदलायच्या भानगडीत न पडता स्वतःला बदला, सत्संग करा, अध्यात्माकडे वळा असे प्रतिपादन डॉ. विलास सोमवंशी यांनी केले.

पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्यावतीने आयोजित “निरामय आनंदी जीवन” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार आणि उपाध्यक्षा शकुंतला शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उन्नती सोशल फाउंडेशनच्या प्रांगणात रविवार दि.२९ रोजी हा कार्यक्रम झाला.
आपल्या व्याख्यानात डॉ. सोमवंशी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्म आणि आरोग्य यांची योग्य सांगड घालून सुखी जीवनाचे मर्म समजाऊन सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे सदस्य नीता गुप्ता, सुरेखा पाटील, शशिकांत कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, उषा भागवत, अशोक येळंमकर, शोभा पोरवाल यांनी कविता आणि गाणी सादर केली. प्रास्ताविक डॉ.सुभाष पवार यांनी केले. सुत्रसंचलन निर्मला कासार यांनी केले तर सखाराम ढाकणे यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group