पिंपरी (Pclive7.com):- मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाला जुन्या ओळखीच्या चौघांनी गाठून पिस्तुल रोखत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ८) रात्री नऊच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रम रोडवरील नवीन पुलाजवळ घडली.

याप्रकरणी अनिकेत देवेंद्र गायकवाड (२४, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन विधीसंघर्षित बालकांसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत गायकवाड हे त्यांचे मित्र दत्ता लांडगे आणि पवन अवचरे यांच्यासह नवीन पुलाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हावरून चार आरोपी तेथे आले. त्यातील एका आरोपीने कमरेला लावलेले पिस्तुल काढून फिर्यादीच्या दिशेने रोखले. “तुला लय माज आहे का, तू अमोल भोसलेसोबत का फिरतोस, आज तुला खल्लासच करतो,” अशी धमकी देत आरोपींनी शिवीगाळ केली. सांगवी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group