तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- आमदार सुनिल शेळके यांनी मावळच्या विकासाची वचनपूर्ती करण्याचा संकल्प केला आहे. याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शुक्रवारी (४ ऑक्टोबर) होणार आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजता आई एकविरा देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन, दुपारी २ वाजता कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण आणि लायन्स व टायगर पॉइंट ग्लास स्काय वॉकचे भूमिपूजन आणि तालुक्यातील पवना व इंद्रायणी नदीवरील पुल आणि विविध विकासकामांचा एकाच ठिकाणावरुन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तर दुपारी ४ वाजता सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज समाधी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन या कार्यक्रमांचा समावेश आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना व बाळा भेगडे, माजी आमदार रूपलेखा ढोरे, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे तसेच पै.चंद्रकांत सातकर, बबनराव भेगडे, रमेश साळवे, सूर्यकांत वाघमारे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, दत्ताभाऊ गुंड, राजू खांडभोर, बबन ओव्हाळ, रुपेश म्हाळसकर, यशवंत मोहोळ, आशिष ठोंबरे, लक्ष्मण भालेराव, दत्तात्रय पडवळ आदी मान्यवर, आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.