चिंचवड (Pclive7.com):- स्क्रू ड्राईव्हरने भोसकून एका रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.६) रात्री आठच्या सुमारास चिंचवड येथे घडली. दरम्यान १२ तासांच्या आत चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अमीर मकबूल खान (रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. संशयित आरोपी फरार झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर खान हा चिंचवड परिसरात रिक्षा चालवत होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास चिंचवड येथील देशी दारूच्या दुकानाशेजारी त्याचा एकासोबत वाद झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, संशयित आरोपीने अमीरला स्क्रू ड्रायव्हरने भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच्याच आधारे पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.