महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रचारात जोरदार आघाडी
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ रावेत प्रभागातील भाजप आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने घोंगडी बैठका आणि कोपरा सभांचा धडाका लावत प्रचारात आघाडी घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत शंकर जगताप यांचे नाव जाहीर होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच रावेतमधील प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.
रावेतमधील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोंगडी बैठका आणि कोपरा सभांना स्वयंस्फूर्तीने हजेरी लावली. आणि रावेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनाच मतदान करण्याचा संकल्प केला.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच रावेतमधील १८ मीटर डीपी रस्त्यांचा विषय मार्गी लागला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभही करण्यात आला. त्याबद्दल रावेतमधील सर्व सोसायटीधारक आणि नागरिकांनी जगताप यांचे आभार व्यक्त करत यापुढेही रावेतच्या शाश्वत विकासासाठी त्यांनाच मतदान करू, असा निर्धारही त्यांनी केला.
या घोंगडी बैठकांचे नियोजन माजी नगरसेविका संगीता भोंडवे, रावेत-काळेवाडी मंडलअध्यक्ष सोमनाथ भोंडवे, माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे, पोपट भोंडवे, युवा नेते दीपक भोंडवे, सुरेश भोंडवे, कुणाल भोंडवे, अजय भोंडवे, श्रीकांत भोंडवे, किरण भोंडवे, सुनील भोंडवे यांनी केले होते. तर यावेळी सिल्वर लँड फेज 3 सोसायटीचे चेअरमन वैभव देशमुख, नचिकेत देशमुख, अविनाश चोबले, विकास जाधव, सुशील कदम, प्रतिभा देशमुख, आर्यावत सोसायटीचे चेअरमन विजय चौधरी, सचिन गावडे, निखिल जाधव, सूरज काळे, समीर गडकरी, प्रितिसिंग परदेशी, अनघा गडकरी, प्रियांका फाळके, लक्ष्मी भट्टाचार्या, अभय जोशी, विनोद ठाकूर, अल्लूर फेज – १ सोसायटीचे आशिष राऊत, मुकुंद पाटील, मदन सुरवसे, प्रशांत जाधव, किरण सारगावकर, अल्लूर फेज – २ सोसायटीचे अमोल लहाने, मिलिंद नंदनवार, विवेक देशमुख, प्रशांत खराडे, महेश किल्लेदार, आशिष पाटील, कस्तुरी होम सोसायटीचे आनंद खोत, इंद्रजित माने, अनिल अथनीकर, सुरेश किताडीकर, बाबाजी पोखरकर, राम तायडे, धीरज हिरस्कर, अनिरुद्ध खन्ना, महेश विंचूरकर, मुकुंदा करंबेळकर, संजय रायकर, शहाजी पाटील, निलेश पाटील, ऋषिकेश जाधव यांच्यासह सर्व सोसायटीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.