चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे युथ आयकॉन आमदार रोहित पवार यांचा उद्या शनिवारी (ता.९) सायंकाळी पाच वाजता आहेर गार्डन, चिंचवड येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहाराध्यक्ष ऍड. सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, युवकचे शहाराध्यक्ष इम्रान शेख, युवा सेना प्रमुख चेतन पवार, काँग्रेस युवकचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, मीना जावळे आपचे रविराज काळे, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात रोहित पवार खास युवकांशी संवाद साधणार आहेत तसेच महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधन करणार आहेत. प्रचाराच्या पुढील बारा दिवसांची रणनीती ठरवण्या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत.