चिंचवड (Pclive7.com):- राज्यात महायुतीच्या सरकारने अनेक विधायक निर्णय घेतले मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करून महिला भगिनींना मदतीचा हात दिला. शेतकरी बांधव, युवा तरुण यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक योजना या सरकारने आणल्या. म्हणून आम्ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, असे सांगत थेरगाव परिसरातील मतदारांनी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना आमदार करण्याचा निर्धार केला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाव परिसरातील ग्रामस्थांच्या तसेच मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून समस्त गावकरी मंडळींचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेविका झामाबाई बारणे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रचार दौऱ्यात गावकऱ्यांनी विकासाबाबत आपली अपेक्षा व्यक्त केली. ‘परिसराच्या विकासासाठी शंकर जगताप यांना भरघोस मतदान करा’ असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले. तसेच या परिसराचा अधिक वेगाने विकास आणि अधिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेचा भागीदार होण्याचे आवाहन केले. स्थानिक पातळीवर केलेल्या चर्चेमुळे, अनेक ग्रामस्थांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्धार केला, ज्यामुळे थेरगाव परिसराच्या प्रगतीला नव्याने दिशा मिळणार आहे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.