पिंपरी (Pclive7.com):- आमदार अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी (दि.१५) मोहननगर, काळभोरनगर परिसरात पदयात्रा काढली. शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी होत असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना सर्व स्तरातून पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे आता आमदार अण्णा बनसोडे यांना विक्रमी मताधिक्य मिळणार असल्याची खात्री महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
खासदार श्रीरंग बारणे हे देखील मोहननगर येथे पदयात्रेत सहभागी झाले. खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या विजयाची खात्री दिली. यावेळी आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, नारायण बहिरवडे, चंद्रकांता सोनकांबळे, निलेश तरस, राजू दुर्गे, राजेश पिल्ले, मेहुल भरतदोशी, सतीश काळभोर, सुजाता पालांडे, वैशाली खामकर, तेजस्विनी कदम, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, शैलजा मोरे, मोहिनी टेकवडे, किरण देशमुख, कैलास कुटे, संजय जगताप, गणेश लंगोटे, वैशाली काळभोर, आयुष निंबाळकर, मनीषा शिंदे, तेजस्विनी दुर्गे, रेखा काडाणी, सुप्रिया चांदगुडे, शैला मोळक, संगीता लोखंडे, मोनिका कुटे, निर्मला माने, अकबर मुल्ला, गणेश लंगोटे, महादू नेर्लेकर, गिरीश गीते, रामा बहिरवडे, पृथ्वीराज देशमुख, विकी बारुट, शशिकांत पाडाळे, सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, सुनील सूर्यवंशी, प्रकाश गायकवाड, आदित्य राठोड, नागेश वाघमोडे, अमोल गवळी, विजय मिसाळ, शीला भोंडवे आदी उपस्थित होते.
मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा पुढे महावीर पार्क, बाबर गार्डन, गाय वासरू चौक, लोखंडे दवाखाना, दत्त मंदिर, अलंकार कॉर्नर, फुलेनगर, शंकर मंदिर कॉर्नर, तुळजाभवानी माता मंदिर, मनपा शाळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवदर्शन कॉलनी, कलावती माता मंदिर, वहिले चाळ, संतोषी माता मंदिर, काळभोर नगर या परिसरातून काढण्यात आली.
आमदार अण्णा बनसोडे यांचा वैयक्तिक जनसंपर्क मोठा आहे. त्यात आता महायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या बहुतांश उमेदवारांनी माघार घेत आमदार बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यात शहराच्या विविध भागात काढलेल्या पदयात्रेला दिवसेंदिवस अतिशय मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांचा विजय निश्चित असून मताधिक्य मोठी वाढ होणार असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
आमदार म्हणून काम करत असताना मागील दहा वर्षात रस्ते, पाणी, आरोग्य अशा मूलभूत सुविधांसह नोकरीच्या संधी वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. पिंपरी मतदार संघात लांडेवाडी येथे सॉफ्टवेअर कंपनी सुरू होत असून त्यामध्ये 30 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांना हक्काची पक्की घरे मिळतील. सर्व स्तरातून पाठिंबा वाढत आहे.
– आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी विधानसभा.
आमदार अण्णा बनसोडे यांना या निवडणुकीमध्ये चांगले मताधिक्य मिळेल. सर्व स्तरातून त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे सुरुवातीला जे अपेक्षित मतदार मताधिक्य होते. त्यामध्ये आता वाढ होणार अशी खात्री आहे.
– चंद्रकांता सोनकांबळे, आरपीआय नेत्या.