मुंबई (Pclive7.com):- विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, आज आठ दिवस होऊनही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. पण अद्याप सरकारमधील मंत्रिपदाचा तोडगा निघालेला नाही. यातच मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे देखील स्पष्ट झालेलं नाही. यातच दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर आता आघाडीतील नेते कामाला लागले आहेत. तसेच पराभवाची कारणं आता नेत्यांकडून शोधण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवरच काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाबाबत चर्चा झाली. तसेच यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबाबादारी सोपण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Tags: आमदार उत्तम जानकरआमदार जितेंद्र आव्हाडआमदार रोहित पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार