जितो पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष पदी आनंद मुथा तर उपाध्यक्ष पदी तुषार लुणावत यांची निवड
पिंपरी (Pclive7.com):- जितो पिंपरी चिंचवडचा शपथ ग्रहण सोहळा चिंचवड येथील एल- प्रो मॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जितो पिंपरी चिंचवड चँप्टरच्या अध्यक्षपदी:आनंद मुथा, उपाध्यक्षपदी: प्रकाश गादीया, दिलीप सोनिग्रा, मुख्य सचिव: तुषार लुणावत, सचिव: अभिषेक जैन, नितीन जैन, खजिनदार: नवनीत बोरा, संयुक्त खजिनदार: सीए वैभव मोदी, चॅप्टर डायरेक्टर: प्रितम दोशी, हर्षद खिंवसरा, राजेंद्र मुथा, अशोक बागमार, नेमिचंद ठोळे, दीपेश बाफना, सचिन धोका, सल्लागार समितीपदी: राजेंद्र जैन, संतोष धोका, मनीष ओसवाल, तृप्ती कर्णावट, वैशाली बाफना यांची निवड करण्यात आली आहे. तसेच लेडीज विंग मध्ये अध्यक्षा: पूनम बंब, उपाध्यक्षा: मोनिका धोका, सारिका सोलंकी, मुख्य सचिव: मीना टाटिया, सचिव: हर्षा लोढिया, शमा अजमेरा, खजिनदार: प्रियांका जैन, यांची तर यूथ विंगमध्ये अध्यक्ष: सौरभ बेदमुथा, उपाध्यक्ष: अभिषेक कटारिया, मुख्य सचिव: अनुज चोपडा, सचिव: वर्धन खिंवसारा, प्रतीक तातेड, खजिनदार: निधी तातेड, संयुक्त खजिनदार: सम्यक कटारिया यांची निवड करण्यात आली आहे.
या शपथ विधी कार्यक्रमात 18 जणांना FCP व 19 जणांना पेट्रोन मेंबर बनविण्यात आले. यावेळी जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, राजेन्द्र जैन, इंद्रकुमार छाजेड, सुभाष ललवाणी, राजेंद्र लुंकड, रवींद्र लुंकड, कैलास लुनावत, रोहित बोराना, खुशाली चोरडिया, प्रियांका परमार, किशोर टाटिया, नितीन बेदमुथा, निकुंज ओसवाल, गौरव नहार, प्रसन्न चोपडा, हेमंत गुगळे यांच्या सह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.