माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार
पिंपरी (Pclive7.com):- औद्यगिक क्षेत्रातील वाढत्या बदलामुळे कामगार संघटना मोडकळीस येऊन कामगारांचे उद्योगधंदे संकटात आले आहेत. नोकरीवरच गदा येत असल्याने वेतन करार करताना अडचणी येत होत्या.
कामगार कपात आणि वेतन कपातीच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. तशातच व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात समन्वय साधून वेतन करार करून माथाडी कामगारांना आणि व्यवस्थापन यामध्ये मार्ग काढून त्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्नही महाराष्ट्र मजदुर संघटना करीत आहे. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटना आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, तथा शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरातील एका नामंकित कंपनीतील युनिट्समध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना 5250 रुपयांची घसघशीत पगारवाढ लागू करण्यात आली. ही पगारवाढ जुलै 2024 या महिन्याच्या पगारामध्ये समाविष्ट देखील करण्यात आली आहे.
वेतनात भरघोस वाढ झाल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानिमित्त कामगारांनी इरफान सय्यद यांचा युनियनच्या कार्यालयात नुकताच सत्कार आयोजित केला होता. कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, जनरल सेक्रेटरी प्रवीण जाधव, संघटक प्रदीप धामणकर, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग कदम, रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश कंठाळे, गोरक्ष दुबाले, श्रीकांत मोरे, बबन काळे, सुनील सावळे, अशोक साळुंके, नागेश व्हनवटे, समर्थ नायकवडे, विश्वनाथ गांगड, अमित पासलकर,रत्नाकर भोजणे, गणेश नाईकवाडे, आयुष शिंदे तसेच माथाडी मंडळातील टाटा ऑटो कॅम्प सिस्टीम लिमिटेड चिंचवड मुकादम केशव रासकर, आसल चाकण मुकादम गिरीश देशमुख, आसाल चाकण विजय खंडागळे, टी एम ऑटोमॅटिक सिस्टीम चिंचवड मुकादम गणेश पिंपरे, टॅको हॅन्ड्रीक्सन चाकण, मुकादम सचिन नाळे, टाटा ऑटो कॉम सिस्टम हिंजवडी मुकादम स्वामी गंगाधर, भोसरी मुकादम प्रताप खाडे कामगार नामे सुमित पाठारे, दौलत पवार, प्रदीप डफळ, विशाल कांबळे, दीपक शेळके, सिद्धेश्वर फाटक, प्रसाद शिंदे, संदीप धायरकर, दिलीप तेलंगे, शंकर स्वर्गेकर, आप्पासाहेब नवले, नामदेव जाधव, तसेच माथाडी कामगार व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. कामगारांनी यावेळी इरफानभाईंचे आभार मानले.
इरफान सय्यद म्हणाले की, कामगारांना कंपनी व्यवस्थापनाचे नेहमीच सहकार्य आहेच. कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमधील चर्चेने विषय सोडविण्याचे काम संघटना करीत असते. यापुढील काळातही कामगार व प्रशासनाने बरोबर राहून कंपनीचे व कामगारांचे हित जपावे. महाराष्ट्र मजूर संघटना ही हिंदु हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन निर्माण झालेली संघटना आहे. कामगार हिताचे बाळकडू प्यायलेली ही संघटना केवळ कामगारांचे हित जपण्यातच धन्यता मानते. त्यामुळे कष्टकरी कामगार हे संघटनेकडे आपलेपणाने पाहतात. आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी सदैव झटत राहू आणि सर्वच स्तरातील श्रमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत राहू. भरघोस पगारवाढ मिळाल्याने कामगारांना शुभेच्छा. कामगारांनी आपली एकजूट अशीच कायम ठेवावी.