राजगुरुनगर (Pclive7.com):- पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखा व स्व. प्रा. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ज्येष्ठ कवी व समीक्षक केशव सखाराम देशमुख यांच्या हस्ते प्राचार्य भोसले यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिव व्याख्याते गुलाबराव वळसे, साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, ॲड. सतिश गोरडे, पुरुषोत्तम सदाफुले, डी. के. वडगावकर व साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे उपस्थित होते.
ज्येष्ठ कवी केशव देशमुख यावेळी म्हणाले की, पद्मश्री नामदेव ढसाळ हे काचेच्या बंगल्यात बसून लिहिणारे कवी नव्हते, तर ते आयुष्यभर रणांगणावर लढणारे कवी होते. पद्मश्री नामदेव ढसाळ हे कुठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते, तर माणसांच्या विषयातले पदवीधर होते. ढसाळ हे जागतिक कवी होते, त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे नवोदित साहित्यिकांसाठी महत्वाची बाब आहे असेही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी धनाजी घोरपडे, सचिन शिंदे, किरण भावसार, भारत सातपुते, संतोष आजकर, डॉ. राजेंद्र माने यांना साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले. तर पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. धर्मनाथ पवळे यांनी संयोजन केले प्रा. कविता राऊत यांनी बाबाजी शिंदे सूत्रसंचालन तर श्री मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.























Join Our Whatsapp Group