पिंपरी (Pclive7.com):- स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त केसबी चौकातील अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य माथाडी कामगार उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर ६०-७० च्या कालखंडात कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित होते. तेव्हा कायदे नव्हते त्यामुळे त्यांचे शोषण व्हायचे. आरोग्याच्याही समस्या होत्या. अशा परिस्थितीत स्व. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांचे संघटन केले आणि त्यांच्या व त्यांच्या बरोबरील सहकार्याच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात सर्वात प्रथम असंघटित कामगारांसाठी कायदा तयार करण्यात आला. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील हे लाखो माथाडी कामगारांच्या घरातील दैवत बनले. असंघटित कामगारांप्रमाणेच दुर्लक्षित घटक, वंचितासह समाजासाठी अण्णासाहेबांनी सामाजिक आंदोलनाच्या लढ्यात प्राणाच्या समिधा अर्पण करून अनेक समस्या आणि प्रश्न मार्गी लावले.

कष्टकरी, गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आपले आयुष्य वेचणारे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते कामगार मित्र इरफानभाई सय्यद बोलत होते.

त्यांच्या समवेत संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, जन. सेक्रेटरी प्रवीण जाधव उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, पांडुरंग काळोखे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, सर्जेराव कचरे,नागेश व्हणवटे, गोरक्ष दुबाले,बबन काळे, अशोक साळुंके,दादा कदम,समर्थ नाईकवाडे, अमित पासलकर, संपत मांढरे,ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख,चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, संदीप जांभळे,रोहित नवले, बालाजी खैरे,विकास साळुंखे,सुनील खोपडे ,राहुल मांडवे, विनोद जाधव,सोमनाथ देशमुख, निलेश चतुर, सचिन प्रचंड, संतोष पवार, नवनाथ नरळे, अमर सय्यद, अक्षय कदम, गणेश देवडकर, अतुल फरतडे, युवराज पोतेकर, सूरज भोसले, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजने, आयुष शिंदे, गणेश नाइकवाडे व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group