पुणे (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय असलेले आणि पुणे महापालिकेत माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार, एका महिलेने विद्यादिप गृह संस्था मर्यादित स.नं. ३२/०२/१० धनकवडी पुणे सोसायटीमध्ये मागील ०४ महिन्यापासुन फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळ्या व्यक्तीच्या घराचे समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवत होती. शनिवारी (दि.२९) रात्री आठच्या सुमारास अमावस्याच्या असल्याने दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याच्या समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवताना महिला निदर्शनास आली.
दत्ता धनकवडे यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान, एक महिला आमच्या सोसायटीजवळ काही भावल्या आणि इतर गोष्टींसोबत जादूटोणा करत असल्याचा संशय सोसायटीतील रहिवाशांना आला. संशयित महिलेने आमच्या घरा जवळील सोसायटीच्या परिसरात भावलीसह अघोरी प्रकार करण्यात सुरुवात केली. त्यानंतर नागरिकांनी तत्परता दाखवत त्या महिलेला पोलिसांच्या हवाली केले आहे, असे धनकवडे यांनी सांगितले. या घटनेबाबत सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिस पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group