पिंपरी (Pclive7.com):- पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणावर हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.५) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रामनगर, रहाटणी येथे घडली.

विश्वजित रणजित वाघमारे (वय १९, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप शिवाजी राजपांगे (वय १९), राहुल सीताराम वाघमारे (वय १८, दोघे रा. रहाटणी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वजित शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरी जात होते. त्यांना आरोपींनी रस्त्यात अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी ‘हा प्रवीण दरेकर सोबत असतो. याची आज विकेट टाकली पाहिजे’ असे म्हणत विश्वजित यांच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात विश्वजित खाली पडले असता आरोपींनी त्यांना सिमेंटच्या गट्टूने मारून गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group