चिंचवड (Pclive7.com):- अक्षय तृतीयेनिमित्त पूर्णानगर येथील श्री स्वामी समर्थ महिला मंडळातर्फे स्वामींना आंब्याची आरास करण्यात आली होती. त्यानंतर महिला मंडळ यांनी हे आंबे देहू येथील वास्तल्य अनाथ आणि दिव्यांग असलेल्या आश्रमातील मुलांना या आंब्यांचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी सेवाभावी संस्थेस सदिच्छा भेट दिली आणि त्या मुलांना आंब्याचे वाटप केले.
यामध्ये अंजली देव, सारिका रिकामे, नीलिमा भंगाळे, गीतांजली पाटील, अश्विनी केवडकर, कांचन नारखेडे, केतकी वजे, सुनीता वायाळ ह्या महिलांचा समावेश होता. खरंच हा आम्हा सर्व महिलांसाठी एक अद्भुत आणि अविस्मरणीय असा दिवस होता. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांना खूप समाधान वाटले. तेथील वृषाली देवतरसे मॅडम यांची उत्तम व्यवस्था आणि त्यांचा संपूर्ण स्टाफची उत्तम देखरेख आणि एकंदरीत मुलांची पोटच्या मुलाप्रमाणे घेणारी जबाबदारी पाहून सर्वांचे मन हेलावून गेले.

खरंच मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, याची साक्षात प्रचिती आली. आणि सर्व महिला मंडळाला अशी संधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांच्यामुळे मिळाली त्याबद्दल त्यांचे देखील संपूर्ण महिला मंडळ तर्फे खूप खूप आभार मानले.