पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 58 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद अशा विविध पदांसाठी कायम शर्यतीत राहणारे, पण ऐनवेळी संधी हुकणाऱ्या शत्रुघ्न काटे यांच्यावरचा अन्याय अखेर दूर करत पक्षाने पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जबाबदारी काटे यांना दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकतिशी सज्ज असल्याचं सांगत पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार आम्ही निवडणुकींना सामोरे जाणार असं नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले आहे.