पिंपरी (Pclive7.com):- श्री सद्गुरू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. प्राधिकरण निगडीच्या तज्ञ संचालकपदी वसंत मल्हारी सगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा सहकार अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहरचे संजय राऊत व निवडणूक अधिकारी संगीता चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ही निवड करण्यात आली.

वसंत सगळे हे गेल्या १५ वर्षांपासून व्यवसाय, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात तसेच पोलिस हक्क संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. शिवसाई नागरी सहकारी पतसंस्थेचे ते माजी संचालक आहेत. निवड झालेले संचालक मंडळात दिगंबर पाटील, सदाशिव सोनवणे, रवी गोडेकर, गणेश काळभोर, बकुळ जगदाळे, शंकर उणेचा, लक्ष्मी दणाने, माधुरी शेलार, दत्तात्रय कांबळे, दशरथ जाधव, प्रमोद पवार तसेच तज्ज्ञ संचालकपदी अॅड. संपत भुजबळ यांची निवड झाली आहे.
सर्व संचालकांच्या वतीने दिगंबर पाटील यांची चेअरमनपदी तर दशरथ जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.