भोसरी (Pclive7.com):- संघर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व बुद्धपौर्णिमा निमित्त भोसरीत आज (दि.१२) प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा बुध्द-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त व बुद्धपौर्णिमे निमित्त संघर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने आज भोसरीत आनंद शिंदे यांचा बुध्द–भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोसरी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व भीमसैनिकानी उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्ष प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोज राजकुमार डोळस यांनी केले आहे. या कार्यक्रमाला भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व सर्व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.