भोसरी (Pclive7.com):- बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.९) रात्री भोसरीतील गाव जत्रा मैदान येथे करण्यात आली.

राहुल बबन म्हस्के (२७, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश भोजने यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राहुल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन काडतुसे जप्त केली. भरत जैद नावाच्या व्यक्तीने ही पिस्तूल राहुल याच्याकडे ठेवण्यासाठी दिली असल्याचे तपासात समोर आले आहे.