पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रात महापालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होणाऱ्या मध्यवर्ती जयंती महोत्सवासाठी तसेच पुढील वर्षभरातील सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. वीणा दत्तानंद सोनवलकर यांची नियुक्ती सर्व समिती सदस्यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली.
आज रविवार दि.11 मे 2025 रोजी काळेवाडी येथील आरंभ बँकव्हेट हॉल या ठिकाणी सकाळी 11 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व समिती सदस्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत मावळते अध्यक्ष धनंजय तानले यांनी सन 2024 ते 2025 या कालखंडात अत्यंत चांगले काम केल्या बद्दल समिती सदस्य अशोक खरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. सन 2025 ते 2026 या कालखंडासाठी नव्याने अध्यक्ष करण्याच्या प्रक्रियेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती असल्यामुळे महिला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव सर्व समिती सदस्यांकडून एकमुखाने आला. या पदावर काम करण्यासाठी अनुक्रमे विणा सोनवलकर, पल्लवी मारकड आणि रेखा दूधभाते या महिला सदस्यांनी इच्छा प्रकट केली. तिनही इच्छुक महिलांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. मावळते अध्यक्ष धनंजय तानले यांच्या हाताने यातील एक चिठ्ठी उघडण्यात आली. या चिठ्ठीत सौ विणा सोनवलकर यांचे नाव आल्याने त्यांना सन 2025 ते 2026 या कालखंडासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.

सर्व समिती सदस्यांच्या उपस्थितीत मावळते अध्यक्ष धनंजय तानले यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा विणा सोनवलकर यांचे स्वागत केले. आणि आपल्या कारभार नवनिर्वाचित अध्यक्षा यांच्याकडे सोपविला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा विणा सोनवलकर, मावळते अध्यक्ष धनंजय तानले, यांच्यासह समिती सदस्य माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, अशोक खरात, महावीर काळे सर, गणेश खरात, बिरु व्हनमाने, पल्लवी मारकड, रेखा दूधभाते, सुवर्णा सोनवलकर, निशा शिंदे, प्रिया पार्टे, पोपट हजारे, बिभीषण घोडके, सदाशिव पडळकर, संजय कवितके, संतोष पांढरे, नवनाथ देवकाते, जितेंद्र मदने, विठ्ठल देवकाते, बंडू लोखंडे, भारत मदने, दत्ता सोनवलकर, मधुकर सलगर आदी सर्वजण उपस्थित होते.