आळंदी (Pclive7.com):- नृसिंह जयंती निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी वर भगवान नृसिंहाचा अवतार चंदन उटीद्वारे साकारण्यात आला होता. हे वैभवी रूप पाहण्यासाठी अनेक भाविकांनी माऊलीं मंदिरात गर्दी केली होती.
नृसिंह जयंती निमित्त मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.नृसिंह जयंती निमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करत हा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री संत गोरोबाकाका मंदिरात नृसिंह जयंती निमित्ताने चंदन उटीद्वारे भगवान नृसिंह अवतार साकारण्यात करण्यात आला. भगवान नृसिंह हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. नृसिंह जयंती हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा ११ मे रोजी नृसिंह जयंती आहे. या दिवशी भगवान नृसिंहाने स्तंभ फोडून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला होता.