भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा; वाहतूक सक्षमीकरणाला मदत, नागरिकांना दिलासा
भोसरी (Pclive7.com):- देहू- आळंदी रस्त्यावर चिखली-पाटील नगर येथील अत्यंत रहदारीच्या ठिकाणी महावितरण प्रशासनाचा जुना ट्रान्सफॉर्मर होता. त्यामुळे रस्त्यात अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडीची समस्या नियमित भेडसावत होती. याची दखल घेत आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार, ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
ट्रान्सफार्मर स्थलांतरीत करण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, समाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, अंकुश मळेकर, मोरे काका, जितेंद्र यादव, संतोश मोरे, दिनेश यादव, योगेश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली- पाटीलनगर येथे देहू- आळंदी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण प्रशासनाचा ट्रान्सफॉर्मर हटवण्याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार, महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर सदर डीपी स्थलांतरीत करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
चिखली आणि परिसरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका विकास आराखड्यातील 7 डीपी रस्त्यांच्या कामांना आपण यापूर्वीच सुरूवात केली आहे. शहरातील ‘‘मिसिंग लिंक’’चाही प्रश्न काही दिवसांत मार्गी लागणार आहे. सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. चिखली- पाटीलनगर परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मर हटवण्याची मागणी होती. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोंडीमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी आम्ही आग्रही आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.