पिंपरी (Pclive7.com):- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त श्री साई चौक मित्र मंडळ, श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णोमाता मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे सोमवारी (दि.१२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे यासर्वांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.

भोसरी इंद्रायणीनगर येथील वैष्णोदेवी मंदिराच्या प्रांगणात १२ ते १४ मे २०२५ या कालावधीत होत असलेल्या ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शत्रुघ्न काटे (शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी- चिंचवड), विलास मडिगेरी (माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड), पांडुरंग बलकवडे (चिटणीस भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे), बस्तीमलजी सोलंकी (भारतातील नामांकित नाणे संग्रह), विलास लांडगे (पुणे विभाग संयोजक स.ग. प्रांत मंडळ सदस्य), किरीट पटेल (गट कार्यवाहक आरएसएस), संतोष चंदने (श्री शिव शस्त्र गाथा ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रात्र प्रदर्शन), कुमार गुरव (दर्यापती शिवराय जहाज प्रतिकृती प्रदर्शन), किरणकुमार करांडे (मराठा साम्राज्यातील नाणी संग्राहक), चंद्रकांत देशमुख, व्यंकटराव शिंदे, शिवकुमार अग्रे, नेताजी घारे, राजेंद्र जगताप, ओंकार हलगौडा संजय जगताप, धनंजय जाधव, हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. तीन दिवस रोज सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती महाराज यांची महाआरती, प्रयागराज कुंभमेळा येथील गंगाजल कलश पूजन व गंगाआरती देखील होणार आहे. या मध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
पहिल्याच दिवशी विद्यार्थी-पालकांची प्रदर्शनाला भेट
प्रदर्शन सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी परिसरातील विद्यार्थी, पालकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांची नाणी, स्वराज्याचे स्वाभिमानी चलन शिवराई. मराठा साम्राज्यातील नाणी, शिवकालीन शस्त्र, गौरवशाली मराठा आरमार याची माहिती अनेक जण जाणून घेत आहेत. तसेच, प्रदर्शनातील आरमारातील जहाज प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. शिवरायांचा इतिहासात समजून घेण्याची ही संधी मिळाल्याची भावना प्रदर्शन पाहून अनेकांनी व्यक्त केली.