पिंपरी (Pclive7.com):- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. विशेष म्हणजे अकरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या पुढे गुण संपादन केले आहेत.

लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वेदिका सिद्धवगोल हिने ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर रिद्धीश तोरवणे याने ९६.०० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर श्लोक शिंदे याने ९५.८० टक्के मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. प्रज्ञा कोतवाल हिने ९५.६० टक्के गुण मिळवत चौथा आणि श्रेया काला व अथर्व पाचरणे यांनी ९५.४० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे पाचवा क्रमांक संपादन केला.
भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या सायली सात्रस हिने ९३.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. आर्यन गायकवाड याने ९२.०० टक्के, तर समीक्षा आढे हिने ८६.६० टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशात विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य, शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.