पिंपरी (Pclive7.com):- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने यंदाच्या वर्षी दिला जाणारा तिसरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार बारामती येथील लता भगवान करे यांना देण्यात आला.
आपल्या आजारी नवऱ्याच्या उपचारासाठी पैशाची कमतरता आहे म्हणून पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक असणारी पाच किलोमीटरची शर्यत अनवाणी धावून वयाच्या ६४ व्या वर्षी जिंकणारी आधुनिक युगातील सावित्री म्हणावं अशा आज रोजी ७० वय असणाऱ्या लता भगवान करे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये देऊन महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
आपला अशा पद्धतीने झालेला सन्मान पाहून डोळे भरून आलेल्या लता भानुदास करे यांनी आपल्या सन्मानाला उत्तर देताना मला अपेक्षित नसताना माझा अशा प्रकारचा सन्मान होणे आणि मला आवश्यक असताना सन्मानाच्या स्वरूपात मला एक लाख रुपये मिळणे ही माझ्यासाठी खूप आणि आनंदाची बाब आहे. या सन्मानासाठी मी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांचे खूप खूप आभार मानते. ज्यांच्या हस्ते मला हा सन्मान दिला गेला ते व्याख्याते नितीन बानगुडे पाटील साहेब यांचे देखील मी खूप खूप आभार मानते.

व्याख्याते नितीन बानगुडे पाटील म्हणाले आपल्या नवऱ्यासाठी जिवाच्या आकांकतेने धावणाऱ्या आणि शर्यत जिंकणाऱ्या लता भगवान करे यांची निवड या जयंती महोत्सव समितीने करणे याच्यावरूनच जयंती महोत्सव समितीच्या कार्याची पद्धत लक्षात येत असून जयंती महोत्सवाचे सदस्य माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी या पुरस्काराबद्दल व्यक्त केलेले मत म्हणजेच भविष्यात हा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक अभूतपूर्व उंची गाठेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. ज्यांचे कार्य समाजात खरोखर दखल घेण्याजोगे असते परंतु अशा व्यक्ती समाजापासून अदखल असतात अशा व्यक्तींना शोधून त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे आणि पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना आर्थिक मदत करणे हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड शहर यांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
या कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न काटे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, भाऊसाहेब भोईर, चंद्रकांता सोनकांबळे, राजेंद्र साळुंखे, शितल शिंदे, अजय पाताडे, प्रतिभा जवळकर, पल्लवी मारकड, तेजस्विनी दुर्गे, प्रीती कामतीकर, सीमा चव्हाण, महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, मारुती भापकर, जयंती महोत्सव समितीचे अशोक खरात, सूर्यकांत गोफणे, महावीर काळे, अजय दूधभाते, मनोज मारकड, गणेश खरात, धनंजय ताणले, बिरू व्हानमाने, दत्ता शेंडगे, नवनाथ बीडे, अभिमन्यू गाडेकर, रेखा दुधभाते, आशा काळे, कैलास सानप, कविता पाटील, नरेंद्र चऱ्हाटे, अंजू सोनवलकर, महेंद्र बाविस्कर, गणेश ढाकणे, सुप्रिया पांडे, महादेव कवितके, विठ्ठल देवकाते, बंडू मारकड सोनाताई गडदे, मुकुंद कुचेकर, आदी सर्वजण उपस्थित होते.
या पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन पोपट हजारे यांनी केले. प्रास्ताविक समितीचे सदस्य माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. तर आभार समितीच्या अध्यक्षा विना सोनवलकर यांनी मानले.























Join Our Whatsapp Group