चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड येथील चैतन्य सभागृह येथे हेमंत डांगे युथ सोशल फाऊंडेशन आयोजित ‘१० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२५’ शनिवारी (दि.०७) आयोजित करण्यात आला होता. चिंचवडगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे यंदा हे सलग ४ थे वर्ष होते.

१० वी व १२ वी तील विद्यार्थ्यांना मागील वर्षात केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना निकालातुन मिळालेच आहे. पण त्या निकालाची कोणीतरी दखल घेऊन त्यांची प्रशंसा करणे म्हणजे त्याच्या पाठीवरती कौतुकाची थापच.. हिच संकल्पना कायम ठेवत हेमंत डांगे यांच्या मार्फत गेली ४ वर्षे अविरत हा गुणगौरव सोहळा सुरु आहे व पुढेही सुरु राहील असे हेमंत डांगे यांनी आपल्या भाषणात नमुद केले.

यावेळी राहुल कलाटे यांनी भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राजेश अवसरे यांनी युवा पिढीला मार्गदर्शन केले. यावेळी राजूभाऊ भालेराव, सागर चिंचवडे, अनिकेत प्रभु, अनिता पांचाळ, वैशाली बोत्रे हे मान्यवर तसेच तुषार वराडे, ओंकार पाटोळे, सुमित कलापुरे, यश कुदळे, परमेश्वर त्रिमाले, शंतनु तेलंग आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group