पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालय सुरु झाले असूनही विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजना अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, साहित्य, तसेच इतर लाभ वेळेवर मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे २७ योजनांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे निवेदन दिले आहे.
संदीप वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये खालील योजनांचा समावेश केला आहे.
०१) इयत्ता ८वी ते १०वीतील विद्यार्थिनींना सायकलसाठी अर्थसहाय्य
०२) SSCमंडळातील इयत्ता १०वीतील मुलींना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सहाय्य
०३) मा. रामभाऊ म्हाळगी योजना–मुलींना तांत्रिक/अभियांत्रिकी प्रशिक्षणासाठी मदत
०४) लोकनायक गोपीनाथ मुंडे योजना–१२वी नंतर वैद्यकीय/अभियांत्रिकी/नर्सिंग अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य
०५) सावित्रीबाई फुले पुरस्कार–सामाजिक संस्थांना स्मृतिचिन्ह प्रदान करणे
०६) नोंदणीकृत बचत गटांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देणे
०७) राणी लक्ष्मीबाई योजना–मुलींसाठी कुंगफू व कराटे प्रशिक्षण
०८) महिलांसाठी योग प्रशिक्षण
०९) महिलांसाठी व्यवसाय कौशल्यवर्धन प्रशिक्षण
१०) महिलांसाठी चारचाकी वाहन प्रशिक्षण
११) १०वीत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस
१२) १०वीत ८०% ते ९०% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस
१३) १२वीत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस
१४) १२वीत ८०% ते ९०% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस
१५) इ. १ ली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनाथ/निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
१६) ० ते २१ वयोगटातीलHIV/AIDSबाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या पालक/संस्थांना मदत
१७) HIV/AIDSबाधित व्यक्तींना PMPML मोफत बस पास
१८) अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींना व्यवसाय प्रशिक्षण
१९) महापालिकेच्या शाळांमधील घरकाम करणाऱ्या मुलांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती
२०) कचरावेचकांच्या मुला-मुलींना १०वी व १२वीसाठी शिष्यवृत्ती
२१) ८वी ते १०वीत शिक्षण घेणाऱ्या कचरावेचकांच्या मुलांना मोफत सायकल
२२) पं. दीनदयाल उपाध्याय योजना–४ ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
२३) दिव्यांग असल्यामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांसाठी आर्थिक सहाय्य
२४) दिव्यांग व्यक्तींनाPMPMLमोफत बस पास सुविधा
२५) ६० वर्षांवरील अंध व्यक्तीसोबत असणाऱ्या एका व्यक्तीस PMPML मोफत बस पास
२६) दिव्यांग विद्यार्थ्यांनाMS-CIT, DTP, TALLYसंगणक प्रशिक्षण
२७) विविध सामाजिक संस्थांना ऐच्छिक अनुदान
ह्या सर्व २७ योजना लवकरात लवकर सुरु झाल्यास पालिकेच्या हद्दीतील हजारो विद्यार्थी, महिला व विशेष घटकांना मोठा दिलासा मिळेल तसेच संबधित विभागास त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.