चिंचवड (Pclive7.com):- पावसाळ्याच्या सुरवातीलाच शहरातील रस्त्याची पुरती वाट लागलेली असून झालेल्या सर्व कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चिंचवड विधानसभेचे युवासेना उपशहरप्रमुख सागर शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सागर शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सध्या पावसाळ्यामुळे अनेक भागात रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. आपण रस्त्याचे काम करत असताना अनेक अटी व नियम लावून रस्ता खराब होणार नाही याची दक्षता घेऊन निविदा काढत असतो. परंतु ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करत आहेत. अनेक शहरातील अनेक भागात ठीक ठिकाणी रस्त्याच्या मध्ये खड्डे पडलेले असून रस्ता खिळखिळा झालेला आहे. त्यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. रस्त्याच्या कडेला बनवलेला फुटपाथ मध्ये आपण पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी नलिका टाकलेल्या असताना सुद्धा कुठल्याही रस्त्यावरती पाणी त्या नलिकेमध्ये जातच नाही. उलट पाणी तुंबून रस्ता जाम होत आहे.
आपण निविदा काढताना ज्या अटी नियम सदर ठेकेदाराला लागू केलेल्या आहेत त्या अटी नियमाप्रमाणे रस्ता तयार झाला नसेल आणि रस्ता निकृष्ट दर्जाचे बनवले गेले असतील तर त्या त्या भागातील त्या ठेकेदारांना उदाहरणार्थ फ्रुट रावेत मार्केट समोर प्रचंड प्रमाणात खड्डे झालेले असून नागरिक जीव मुठीत धरून आपली वाहने चालवत आहेत. आपण या सर्व रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्या ठेकेदारांना मुदतीत रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा त्या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून यापुढे त्यांना काम मिळणार नाही याची दक्षता घ्यावी.






















Join Our Whatsapp Group