पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाइन पार्सलच्या नावाखाली एका महिलेची ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ऑनलाइन घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, महिंद्रा बँक खातेधारक, बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारक आणि मोबाईल क्रमांकधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. तुम्हाला इराणला जाणारे पार्सल आहे, असे सांगून त्यात १५ किलो जनरिक मेडिकल आणि १५ ग्रॅम एम. डी. असल्याचे सांगितले.

आरोपींनी फिर्यादी यांचा आधारकार्ड क्रमांक मागून स्काय ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर युनिफॉर्ममधील दोन पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला.

फिर्यादीचे आयसीआयसीआय बँक खाते इतर दोन व्यक्तींशी लिंक असून त्याद्वारे मनी लाँड्रिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले. आयबीआय क्लिअरन्स आणि पोलिस व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसीआय बँकेच्या ॲपवर प्रक्रिया करण्यास सांगून त्यांच्या खात्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढून ते ट्रान्सफर केले.























Join Our Whatsapp Group