चिंचवड (Pclive7.com):- शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सहा फूट उंचीची नाग प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

तसेच महिलांसाठी झोके बांधण्यात आले होते. नागपंचमीचे पूजन आणि झोक्याचे उदघाटन माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व पुष्पा बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्व महिलांनी मनोभावे नागाची पूजा केली. व झोका खेळण्याचा आनंद लुटला, यावेळी झिम्मा, फुगडी, फेर, गाणी, उखाणे इ. इत्यादी पारंपारिक खेळाचा आयोजन देखील करण्यात आले होते.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण शेतकऱ्याचा मित्र असलेल्या नागदेवाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महिला मंडळाच्या स्नेहा गुणवंत कार्याध्यक्षा सारिका रिकामे, क्षमा काळे, अंजली देव, स्मिता सिरसाठ, मंगल काळे, प्रीती झोपे, सविता राणे, नीलिमा भंगाळे,इ.. आयोजन केले. कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.






















Join Our Whatsapp Group