पिंपरी (Pclive7.com):- कै. विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोनवणे वस्ती चिखली येथील विकास अनाथ आश्रमास एक महिन्याचे धान्य भेट देण्यात आले. कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

आकुर्डी येथील कै.विलास (आप्पा) काळभोर
यांचा ११ वा पुण्यस्मरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी राबवण्यात आला. कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठानच्या वतीने चिखली येथील विकास अनाथ आश्रमाला भेट देण्यात आली. यावेळी तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधत मनमुरात गप्पा मारण्यात आले. त्याप्रसंगी विकास अनाथ आश्रमास एक महिन्याचे धान्य भेट स्वरूपात देण्यात आले.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय विलास काळभोर, दत्ता आगलावे, अमोल सोनवणे, जुनेद शेख, सुरज खवळे, गणेश पवार, अमर चव्हाण, आशपाक शेख, प्रशांत सोनवणे, योगी काळभोर, सोमनाथ गवळी, प्रथमेश शिंदे तसेच प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group