चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट – क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड.राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा तसेच संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या प्रतिमांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. नवले सुनिता व उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांच्या हस्ते क्रांती ज्योतीचे प्रज्ज्वलन करून विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्व सांगण्यात आले. थोर क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांच्या चिंचवडगाव येथील स्मारकास सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागप्रमुख श्रीमती.भळगट साधना, विज्ञान विभाग प्रमुख सौ. कालेकर तेजस्विनी, एम. सी. व्ही.सी विभागप्रमुख श्री. लोखंडे भाऊसाहेब, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.तांबोळी ताहेरा व सौ.चानोदिया स्नेहल, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group