


पिंपरी (Pclive7.com):- स्पाईन रोडवरील घरकुलच्या मुख्य चौकाचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या उपक्रमाचा पुढाकार कीर्तीताई मारुती जाधव युथ फाउंडेशनने घेतला आहे. या चौकाची अवस्था मागील काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय झाली होती. गार्डनमधील गवत वाढून सुशोभीकरणाची पूर्ण दुर्दशा झाली होती.

ही बाब आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे प्रमुख राजेश वसावे व सुपरवायझर नंदकुमार ढवसळकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वसावे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकातील गवत छाटणी, झाडांची कटिंग आणि इतर सुशोभीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ढवसळकर यांच्या देखरेखीखाली काम वेगाने पूर्ण करण्यात आले.

या उपक्रमामुळे पूर्णा नगर, शिवतेजनगर आणि घरकुल परिसरातील नागरिकांनी आमदार महेश दादा लांडगे, राजेश वसावे, नंदकुमार ढवसळकर आणि कीर्तीताई मारुती जाधव युथ फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. चौकाची पाहणी करताना मारुती जाधव, ऋषिकेश जाधव, विशाल गरड, प्रसाद ढमढेरे, अभी जाधव, दीपक मोतेवाड, दत्तात्रय धरमे, कुणाल पळसकर, सेफ खान आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group