


भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड परिसरात भोसरीतील दहीहंडी उत्सवाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भोसरीतील सार्वजनिक दहीहंडीचा प्रथम मान असलेल्या छावा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीला यावर्षी मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण, मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्रसिद्ध रील स्टार मोनालिसा या खास आकर्षण असणार आहेत. त्यामुळे, यंदाची ही दहीहंडी जल्लोषात साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे.

छावा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव भोसरी येथील कै.भगवान गव्हाणे चौक येथे दि.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे.

यंदा छावा प्रतिष्ठान नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. त्यामुळे, यावर्षी दहीहंडीला मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण, मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्रसिद्ध रील स्टार मोनालिसा हजेरी लावणार आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर रक्तदान शिबिरासारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर शिंदे यांनी दिली.























Join Our Whatsapp Group