जगभरातील दंतचिकित्सक व व्यावसायिकांसमोर डॉ. पतकराव सादर करणार टीमने विकसित केलेले डेंटल पेटंट
पिंपरी (Pclive7.com):- वर्ल्ड रेकॉर्ड धारक, डेंटल ऑस्कर विजेते तसेच ब्रिटिश पार्लमेंटरी अवॉर्डी म्हणून सन्मानित करण्यात आलेले नवी सांगवी ,पिंपळे गुरव पुण्याचे नामवंत दंतचिकित्सक डॉ. आदित्य पतकराव हे आगामी नोव्हेंबर २०१५ मध्ये न्यूयॉर्क (अमेरिका) येथे होणाऱ्या विश्व डेंटल समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. पतकराव हे आपल्या टीमने विकसित केलेले डेंटल पेटंट जगभरातील दंतचिकित्सक व व्यावसायिकांसमोर सादर करणार आहेत. तसेच भारतात सातत्याने वाढणाऱ्या डेंटल टुरिझमला चालना देण्याचे कार्यही ते या परिषदेच्या माध्यमातून करणार आहेत.

याविषयी बोलताना डॉ.आदित्य पतकराव म्हणाले की, “मेक इन इंडिया अंतर्गत विकसित झालेले आमचे डेंटल पेटंट जगभरातील दंतचिकित्सकांसमोर सादर करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारतात उपचारासाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे.”

दरम्यान या समिटनंतर नासा टूर एज्युकेशनल प्रोजेक्टचे डायरेक्टर या नात्याने डॉ. आदित्य पतकराव हे अमेरिकेतील अलाबामा राज्यातील हन्सविले येथील नासा स्पेस सेंटरला भेट देणार आहेत. त्यानंतर ते वॉशिंग्टन डी.सी. येथील एका शाळेत जाऊन तेथील शैक्षणिक प्रणालीचाही अभ्यास दौरा करणार आहेत.





















Join Our Whatsapp Group