पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत आकुर्डी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुटे हॉस्पिटलचे डॉ. होडकर सर उपस्थित होते. तसेच अक्रम शेख, सिद्धार्थ वानखेडे, निलेश जाधव, राजु कोलते, अमन शेख, अजित देवकर यांसह आकुर्डी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, वाढदिवस सामाजिक जाणिवेतून साजरा करण्याचा आदर्श या निमित्ताने प्रस्तुत करण्यात आला. हर्षवर्धन सपकाळ यांनी समाजातील वंचित घटकांसाठी सदैव कार्यरत राहण्याची भूमिका या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित केली.























Join Our Whatsapp Group