पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक न्यायाच्या दिशेने राज्यभर सुरू असलेल्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) या अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक विषयाला पिंपरी चिंचवड शहरातून भक्कम जनाधार लाभताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरात अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांची एक व्यापक, अभ्यासपूर्ण आणि दिशा ठरवणारी बैठक पार पडली.

या बैठकीस सुमारे 300 ते 350 प्रतिनिधी विविध समाजातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. ही उपस्थिती केवळ संख्येपुरती मर्यादित न राहता, सामाजिक प्रश्नांविषयीची जागरूकता, अस्मिता आणि न्यायाच्या लढ्याची जाणीव अधोरेखित करणारी ठरली.

बैठकीत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा मुद्दा हा केवळ धोरणात्मक न राहता, तो सामाजिक समतेचा, हक्कांच्या न्याय्य पुनर्वाटपाचा आणि ऐतिहासिक अन्याय दुरुस्त करण्याचा मूलभूत प्रश्न असल्याचे ठामपणे मांडण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवायचा असेल, तर उपवर्गीकरण अपरिहार्य असल्याचा एकमुखी सूर उपस्थितांकडून उमटला.
विशेषतः, चर्मकार समाज, वाल्मिकी समाज आणि मादीगा समाज या प्रमुख समाजघटकांनी अत्यंत ठाम, स्पष्ट आणि संघर्षशील भूमिका घेत या मागणीला पाठिंबा देत, पूर्ण ताकदीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. “आरक्षणातील समानता नव्हे, तर न्याय्य वाटप हा आमचा घटनात्मक अधिकार आहे,” अशी ठाम भूमिका या बैठकीतून पुढे आली.

दरम्यान, अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विषयावर वेळोवेळी भाष्य करत त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारे विधानपरिषद आमदार मा. श्री. अमित गोरखे हे देखील या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत विविध समाजातील पुढील मान्यवर उपस्थित होते :आमदार अमित गोरखे,
भाऊसाहेब अडगळे, संदिपान झोंबाडे, अरुण जोगदंड, युवराज दाखले, मारुती जाधव, भगवान शिंदे, बाबू पाटोळे, संजय ससाणे, अण्णासाहेब कसबे, संजय धुतडमल ,चंद्रकांत लोंढे, अविनाश कांबीकर, अविनाश शिंदे, डि. पि खंडाळे, नाना कसबे, अनिल गायकवाड, निलेश गायकवाड, आनंद कांबळे, विशाल कसबे, नितीन घोलप, शंकर खवळे, सुनील भिसे, राजू आवळे, धीरज सकट, सविता आव्हाड, कविता बोराडे, अमोल कुचेकर, अश्विनी जाधव, हिरामण खवळे, गणेश लोंढे, अक्षय उदगिरे, सनी गवई,मारुती सोनटक्के, अण्णा लोखंडे,राजू आवळे,विठ्ठल शिंदे,स्वप्नील वाघमारे,अमोल खंडागळे,आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
या बैठकीतून विविध समाजघटकांमध्ये निर्माण झालेली एकजूट, समन्वय आणि लढाऊ भूमिका ही या चळवळीची सर्वात मोठी ताकद ठरत असल्याचे स्पष्ट झाले. ही केवळ बैठक नसून, सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवे बळ देणारी आणि आगामी काळात व्यापक आंदोलनाची नांदी ठरणारी घटना असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
पिंपरी चिंचवडमधून उमटलेला हा ठाम आणि एकसंघ आवाज आता राज्याच्या सामाजिक धोरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group