पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे उपाध्यक्ष गणेश लंगोटे यांनी त्यांची पत्नी सौ. अरुणा गणेश लंगोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला आहे.

पक्ष प्रवेशावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश पांढरकर, माजी नगरसेविका वैशालीताई काळभोर आदी उपस्थित होते.

गणेश लंगोटे भारतीय जनता पार्टी कडून प्रभाग क्रमांक १४ चिंचवड स्टेशन, मोहन नगर काळभोर नगर रामनगर येथून तीव्र इच्छुक होते. तशी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.























Join Our Whatsapp Group