पिंपरी (Pclive7.com):- स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या एका नागरिकावर ५०० रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक आरोग्य अधिकारी सोनवणे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे आणि आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच कर्मचारी प्रशांत पवार आणि विशाल यादव यांनी प्रत्यक्ष कारवाई राबविली.

महापालिकेने नागरिकांना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरासमोर येणाऱ्या कचरा संकलन वाहनामध्येच कचरा टाकण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहर स्वच्छतेच्या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group