पुणे (Pclive7.com):- केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. १८ जून) रात्री दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रात्री १०.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबरोबरच ते एक नामवंत पैलवान म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबीयांवर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन शुक्रवार, दि.१९ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील ‘वेणूकृष्णा’ निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. किसनराव मोहोळ यांच्यावर आज (शुक्रवार, दि. १९ जून) सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.





















Join Our Whatsapp Group