पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग ८ मध्ये उभारण्यात आलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्केटिंग ट्रॅक आता शहरातील युवकांसाठी सरावाचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. दीर्घकालीन नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि उत्कृष्ट दर्ज्यावर भर देत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे.

२०१२ ते २०१७ या कालावधीत प्रकल्पाचा ठराव मंजूर करून घेण्यात आला, तर २०१७ ते २०२२ या काळात बांधकामाचे सर्व टप्पे पूर्ण करून या ट्रॅकला प्रत्यक्षात आणले गेले. प्रत्येक टप्प्यावर कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि सुविधा याकडे विशेष लक्ष दिले गेले.

याच कालावधीत, खेळाडूंसोबतच प्रेक्षकांसाठी उत्तम दर्जाची पॅव्हेलियन सुविधा देखील उभारण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा, सराव सत्रे आणि विविध क्रीडा कार्यक्रम अधिक नियोजनबद्ध आणि सोयीस्कर पद्धतीने पार पडू शकतात. आज या ट्रॅकमध्ये फक्त प्रभाग ८ मधीलच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू सरावासाठी येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शहरातील युवकांसाठी एक महत्वाचे क्रीडा केंद्र ठरला आहे.
या स्केटिंग ट्रॅकमुळे युवकांना दर्जेदार सरावाची संधी मिळत असून, भविष्यात येथे तयार होणारे खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रभाग ८ चे प्रतिनिधी आणि “क्रीडा प्रेमी” जनसेवक विलास हनुमंतराव मडिगेरी यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हा प्रकल्प युवकांसाठी नवीन संधी निर्माण करणारा आहे आणि त्यांच्या क्रीडा विकासात मोठा वाटा उचलणार आहे.”

हा स्केटिंग ट्रॅक आपल्या युवकांसाठी फक्त सरावाचे ठिकाण नाही, तर त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देणारी नवीन संधी आहे. येथे तयार होणारे खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उज्ज्वल करतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे.”
– विलास हनुमंतराव मडिगेरी, उमेदवार, भाजपा. प्रभाग ८, इंद्रायणीनगर-भोसरी






















Join Our Whatsapp Group