
आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचा सक्षम व अनुभवी पॅनेल मैदानात
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीने आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम, अनुभवी व लोकविश्वास प्राप्त पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवले आहे. ‘मिशन – अबकी बार १०० पार’ या संकल्पनेअंतर्गत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या ठोस मुद्यांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार भाजप पॅनेलने व्यक्त केला आहे.

भाजपाच्या अधिकृत पॅनेलमध्ये
(अ) श्रीमती अनुराधाताई गोरखे,
(ब) सौ. सुप्रियाताई महेश चांदगुडे,
(क) श्री. कुशाग्र मंगलाताई अशोक कदम आणि
(ड) श्री. तुषार रघुनाथ हिंगे
यांचा समावेश आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय तसेच महापालिकेतील भाजप सत्ताकाळात झालेली विकासकामे नागरिकांसमोर मांडत उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
सर्व उमेदवारांनी प्रभागवासीयांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“अनुभव, प्रामाणिक कामकाज आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ या बळावर आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. ही केवळ निवडणूक नसून जनतेसोबत निर्माण झालेल्या ठाम विश्वासाची लढाई आहे,” असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.

प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासावर विशेष भर देत भाजपाचे चारही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि उमेदवारांचे जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
























Join Our Whatsapp Group